८ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१०७८: जपानी सम्राट होरिकावा यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)

१८७९: अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे सहसंस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)

१९०२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९८४)

१९१२: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)

१९१२: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)

१९२५: शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे यांचा जन्म.

१९२६: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९४)

१९३२: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९९८)

१९३४: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१४)

१९४०: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २००७)

१९५०:  प्लेस्टेशन चे निर्माते केन कुटारगी यांचा जन्म.

१९५२: भारतीय क्रिकेटपटू सुधाकर राव यांचा जन्म.

१९६८: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ऍबे कुरिविला यांचा जन्म.

१९८१: स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.