८ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)

१७६५: प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८२५)

१८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)

१८७७: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९५५)

१८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)

१८९७: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)

१९००: जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिगदर्शक उदय शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)

१९३५: चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.

१९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.

१९४४: चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.

१९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.