८ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१६७७: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)

१७००: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १७८२)

१८२८: फ्रेन्च लेखक ज्यूल्स वर्न यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९०५)

१८३४: रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलिएव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)

१८४४: भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.

१८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)

१९०९: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९९८)

१९२५: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)

१९४१: गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)

१९६३: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.