८ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१९०९: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म.

१९२४: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०००)

१९२५: हिंदी नाटककार राकेश मोहन यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३)

१९२६: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००४)

१९२९: अभिनेता सईद जाफरी यांचा जन्म.

१९३५: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७)

१९३६: परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्योतिंद्रनाथ दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २००५)

१९३९: अभिनेत्री नंदा यांचा जन्म.

१९४२: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक स्टिफन हॉकिंग यांचा जन्म.

१९४५: मराठी लेखिका प्रभा गणोरकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.