८ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१६४२: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४)

१८२५: कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक एली व्हिटनी यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७६५)

१८८४: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)

१९४१: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)

१९६६: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९०९)

१९६७: प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८८० – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)

१९७३: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे निधन.

१९७३: तत्वज्ञ आणि विचारवंत स. ज. भागवत यांचे निधन.

१९७६: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १८९८)

१९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.

१९९२: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन.

१९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.

१९९५: समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन. (जन्म: १ मे १९२२)

१९९६: फ्रान्सचे २१वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.