८ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१६९५: डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १६२९)

१८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)

१९६७: ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)

१९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )

१९९४: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

१९९४: मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.

२००१: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे निधन.

२००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.

२००६: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)

२००७: भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)

२००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.

२०१३: भारतीय लेखक सुन्द्री उत्तमचंदानी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)

२०२०: भारतीय चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदकार सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ सुरमा भोपाली यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९३९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.