८ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१३१७: जपानचे सम्राट फुशिमी यांचे निधन. (जन्म: १० मे १२६५)

१८८८: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)

१९३६: हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८०)

१९६७: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८८३)

१९७९: स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९०२)

१९९६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका गोदावरी परुळेकर यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)

१९९८: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.

२०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२५)

२०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.