९ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

इ.स. पूर्व ५८५: जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पूर्व ७११)

१६२६: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १५६१)

१६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.

१९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन.

१९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन. (जन्म: २२ जून १९०८)

२००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३०)

२००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२१)

२००९: हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९२६)

२००९: लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.