९ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.

१९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.

१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

१९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.

१९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

२००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.