९ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१९१३: अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)

१९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.

१९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

१९२६: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)

१९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.

१९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)

१९३८: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

१९५१: ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.

१९६५: नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.