९ जुलै रोजी झालेले जन्म.

१६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन यांचा जन्म.

१७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म.

१८१९: शिवणयंत्राचा संशोधक एलियास होव यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८६७)

१९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

१९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १९६४)

१९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन यांचा जन्म.

१९२३: परम विशिष्ठ सेवा पद आणि वीर चक्र सन्मानित मेजर-जनरल लच्छमानसिंग लेहलयांचा जन्म. (मृत्यू: १८ जून २०२० )

१९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१४)

१९३८: चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

१९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म.

१९५०: युक्रेन चे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म.

१९७१: नेटस्केप चे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.