९ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)

१९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८५५)

१९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)

१९९३: संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.

२००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

२०२०: भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार रांजॉन घोषाल यांचे निधन. (जन्म: ७ जून १९५५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.