९ जून रोजी झालेले मृत्यू.

६८: रोमन सम्राट नीरो यांनी आत्महत्या केली. (जन्म: १५ डिसेंबर ३७)

१७१६: शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १६७०)

१८३४: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)

१८७०: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)

१९००: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. (जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)

१९४६: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १९२५)

१९८८: अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन.

१९९३: बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९९५: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन.(जन्म: ७ नोव्हेंबर १९००)

१९९७: इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.

२०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.

२०११: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.