९ मार्च – मृत्यू

९ मार्च रोजी झालेले मृत्यू.

१६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.

१८५१: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)

१८८८: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १७९७)

१९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)

१९७१: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन. (जन्म: १४ जून १९२२)

१९९२: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)

१९९४: भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १९०८)

२०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९२९)

२०१२: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)