९ मे रोजी झालेले जन्म.

१५४०: मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १५९७)

१८१४: अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८२)

१८६६: थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)

१८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ – पुणे)

१९२८: समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.