९ मे रोजी झालेले मृत्यू.

१३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.

१९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास यांचे निधन.

१९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८६१)

१९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८५२)

१९५९: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)

१९८६: एवरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेलसिंग नोर्गे यांचे निधन. (जन्म: २९ मे १९१४)

१९९५: दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)

१९९८: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९२४ – लखनौ, उत्तर प्रदेश)

१९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन.

२००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर यांचे निधन.

२०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९३५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.