९ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१७५७: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)

१८५२: रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९१९)

१८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून १९४७)

१८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९२८)

१८९७: मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७)

१९०६: सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेघोर यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २००१)

१९२४: भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९५७)

१९६६: इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांचा जन्म.

१९६६: प्लाझा मॅगझीनचे संस्थापक क्रिस्टोफर ओस्टलंड यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.