अध्रेंदू भूषण बर्धन
जन्म: २५ सप्टेंबर १९२५ – निधन: २ जानेवारी २०१६
अध्रेंदू भूषण बर्धन हे स्वातंत्र्य सैनिक, कामगार संघटनेचे नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस होते. वयाच्या पंधरा वर्षापासून त्यांनी कम्युनिझमच्या स्वीकार केला. आयुष्यातील ७७ वर्षे कम्युनिस्ट असूनही, ते वैचारिक कट्टरपंथीला बळी पडले नाहीत. लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेला प्रतिसाद म्हणून त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेसाठी त्यांची खास ओळख आहे. धर्मनिरपेक्ष भारत ह्या विचारसरणी आणि त्यासंदर्भात कार्य करण्यासाठी बर्धन यांचे योगदान अतिशय महत्वाचे मानले जाते.