बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकर

६ जानेवारी १८१२ –  १८ मे १८४६

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले पत्रकार होते. त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतले पहिले वृत्तपत्र सुरू केले. तसेच त्यांनी १९४० साली दिग्दर्शक नावाचे मासिक सुद्धा सुरु केले. दिग्दर्शन मासिकामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, इतिहास इत्यादी विविध विषयांवर लेख प्रकाशित केले गेले. महाराष्ट्रातील जनसामान्य लोकांपर्यंत पत्रकारिता द्वारे माहिती पोहोचावी हेच ह्या मागचे उद्दिष्ट. पहिले मराठी वृत्तपत्र आणि पहिले मराठी मासिक या योगदानासाठी त्यांना मराठी पत्रकारितेचा जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन साजरा करण्यात येतो.