भारतीय लष्कर दिन

bhartiya lashakar din

भारतीय लष्कर दिन

१५ जानेवारी

फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय सैन्यातील पहिले कमांडर-इन-चीफ-जनरल म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल, भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिश कमांडर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून के. एम. करिअप्पा यांनी सूत्रे हातात घेतली. ते स्वतंत्र भारताच्या लष्करी सेने चे पहिले कमांडर-इन-चीफ झाले. ह्याच ऐतिहासिक घटनेच्या आठवणी साठी हा दिन देशभरातील सर्व सेनादलात साजरा केला जातो. तसेच आजच्या दिवशी देश आणि देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या जीवनाचे बलिदान देणा वीर सैनिकांना अभिवादन देण्यात येते. या दिवशी सेनेचे शौर्य पुरस्कार (परमवीरचक्र, अशोक चक्र) आणि सेना पदके देखील प्रदान केली जातात.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.