३१ जानेवारी – मृत्यू

३१ जानेवारी - मृत्यू

३१ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९५४: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८९०) १९६९: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ – पुणे, महाराष्ट्र) १९७२: नेपाळचे राजे महेन्द्र यांचे निधन. १९८६: संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे निधन. १९९४: मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन. १९९५: बँकिंग तज्ञ, रोखे बाजार […]

३१ जानेवारी – जन्म

३१ जानेवारी - जन्म

३१ जानेवारी रोजी झालेले जन्म. १८९६: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१) १९३१: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८) १९७५: चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.

३१ जानेवारी – घटना

३१ जानेवारी - घटना

३१ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत. १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात. १९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले. १९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. १९४९: बडोदा व कोल्हापूर […]

३० जानेवारी – मृत्यू

३० जानेवारी - मृत्यू

३० जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९४८: महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९) १९४८: आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राईट यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८७१) १९५१: ऑस्ट्रियन वाहन अभियंता फर्डिनांड पोर्श यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८७५) १९९६: हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन. २०००: मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य […]

३० जानेवारी – जन्म

३० जानेवारी - जन्म

३० जानेवारी रोजी झालेले जन्म. १८८२: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९४५) १९१०: गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००) १९११: शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९८७) १९१७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००७) १९२७: स्वीडनचे २६ […]

३० जानेवारी – घटना

३० जानेवारी - घटना

३० जानेवारी रोजी झालेल्या घटना. १६४९: इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला. १९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला. १९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला. १९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला. १९९७: […]

२९ जानेवारी – मृत्यू

२९ जानेवारी - मृत्यू

२९ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १५९७: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन. (जन्म: ९ मे १५४०) १८२०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचे निधन. (जन्म: ४ जून १७३८) १९३४: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ – वॉर्क्लॉ, पोलंड) १९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन. १९६३: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७४) […]

२९ जानेवारी – जन्म

२९ जानेवारी - जन्म

२९ जानेवारी रोजी झालेले जन्म. १२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १२९७) १७३७: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८०९) १८४३: अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१) १८५३: ओडिया साहित्यिक मधुसूदन राव यांचा जन्म. १८६०: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै […]

२९ जानेवारी – घटना

२९ जानेवारी - घटना

२९ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. १८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले. १८८६: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले. १९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील […]

२८ जानेवारी – मृत्यू

२८ जानेवारी - मृत्यू

२८ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १५४७: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचे निधन. (जन्म: २८ जून १४९१) १६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म: २४ सप्टेंबर १५५१) १८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५) १९८४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८९७) १९९६: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न […]

२८ जानेवारी – जन्म

२८ जानेवारी - जन्म

२८ जानेवारी रोजी झालेले जन्म. १९४९: पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते जेर्झी स्काझाकिएल यांचा जन्म. ( मृत्यू: १ सप्टेंबर २०२०) १४५७: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १५०९) १८६५: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८) १८९९: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १५ मे १९९३) १९२५: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे […]

२८ जानेवारी – घटना

२८ जानेवारी - घटना

२८ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध. १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला. १९६१: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला. १९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा […]

२७ जानेवारी – मृत्यू

२७ जानेवारी - मृत्यू

२७ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९४७: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८६८) १९६८: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०२) १९८६: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९३१) २००७: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९३२) २००८: इंडोनेशियाचे दुसरे […]

२७ जानेवारी – जन्म

२७ जानेवारी - जन्म

२७ जानेवारी रोजी झालेले जन्म. १७५६: ऑस्ट्रियन संगीतकार वूल्फगँग मोझार्ट यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १७९१) १८५०: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९१२) १९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९९४) १९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९९८) १९२६: भारताचे १३ वे […]

२७ जानेवारी – घटना

२७ जानेवारी - घटना

२७ जानेवारी रोजी झालेल्या घटना. ९८: ट्राजान हे रोमन सम्राट झाले. १८८०: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले. १८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना. १९२६: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले. १९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला. १९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या रेड आर्मीने […]

२६ जानेवारी – मृत्यू

२६ जानेवारी - मृत्यू

२६ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १७३०: कवी श्रीधर यांनी समाधि घेतली. १८२३: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचे निधन. (जन्म: १७ मे १७४९) १९५४: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १८८७) १९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १८८०) २०१५: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी […]

२६ जानेवारी – जन्म

२६ जानेवारी - जन्म

२६ जानेवारी रोजी झालेले जन्म. १८९१: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९३७) १९२०: भारतीय प्रथम क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार वसंत नायसादराय रायजी यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून २०२०) १९२१: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९९९) १९२५: अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर पॉल न्यूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००८) १९५७: क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा […]

२६ जानेवारी – घटना

२६ जानेवारी - घटना

२६ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली. १६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया. १८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले. १८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली. १९२४: […]

२५ जानेवारी – मृत्यू

२५ जानेवारी - मृत्यू

२५ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १६६५: सोनोपंत डबीर यांचे निधन. १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन. १९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन. २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन. २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ – हातकणंगले)

२५ जानेवारी – जन्म

२५ जानेवारी - जन्म

२५ जानेवारी रोजी झालेले जन्म. १६२७: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१) १७३६: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १८१३) १८६२: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म. १८७४: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५) १८८२: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च […]

२५ जानेवारी – घटना

२५ जानेवारी - घटना

२५ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली. १८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली. १९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली. १९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला. १९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले. १९८२: […]

२४ जानेवारी – मृत्यू

२४ जानेवारी - मृत्यू

२४ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९६५: दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४) १९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९) २००५: गोवा मुक्तिसंग्राम अनुताई लिमये यांचे निधन. २०११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर […]

२४ जानेवारी – जन्म

२४ जानेवारी - जन्म

२४ जानेवारी रोजी झालेले जन्म. १९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००० – मुंबई) १९२४: मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१) १९४३: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक सुभाष घई यांचा जन्म.

२४ जानेवारी – घटना

२४ जानेवारी - घटना

२४ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. १८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली. १८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली. १९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे […]