डॉ. सतीश धवन
जन्म:२५ सप्टेंबर १९२० – निधन: ३ जानेवारी २००२
डॉ. सतीश धवन हे भारतीय गणितज्ञ आणि एरोस्पेस अभियंते (अंतराळ शास्रज्ञ) होते. त्यांना भारतातील प्रायोगिक द्रव गतिमान संशोधनाचे जनक म्हणून ओळखले जाते. ग्रामीण शिक्षण, रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन्स अश्या अनेक महत्वाच्या विषयात त्यांनी अग्रणी प्रयोग केले. ते १९७२ पासून १९८४ पर्यंत भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटने (इस्रोचे) चे अध्यक्ष तसेच भारतीय स्पेस कमिशनचे अध्यक्ष आणि स्पेस विभागाचे सचिव होते. त्यांना भारताचा दूसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले आहे.