२०१५:
डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
२००७:
इंग्लंड मध्ये सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.
२००२:
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.
२००१:
फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
१९९७:
सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताची कुंजराणी देवी यांना स्थान मिळाले.
१९९१:
सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.
१९८०:
ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.
१९७९:
सोनी कंपनी ने व्हॅकमन प्रकाशित केला.
१९६६:
कॅनडा मधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण टोरांटो येथून सुरु झाले.
१९६४:
न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
१९६३:
अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.
१९६२:
सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.
१९६१:
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.
१९६०:
रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
१९५५:
स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.
१९४९:
त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले.
१९४८:
कायदेआझम मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उदघाटन झाले.
१९४८:
कायदेआझम मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उदघाटन झाले.
१९४७:
फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
१९३४:
मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
१९३३:
नाट्यमन्वंतरच्या आंधळ्यांची शाळा नाटकाचा १ला प्रयोग झाला.
१९१९:
कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात.
१९०९:
क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.
१९०८:
एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
१९०३:
पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरवात झाली.
१८८१:
जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.
१८७४:
पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.
१८३७:
जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
१६९३:
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2022