१९ सप्टेंबर घटना - दिनविशेष


२०२१: कुंब्रे व्हिएजा ज्वालामुखीचा उद्रेक - ला पाल्माच्या स्पॅनिश कॅनरी बेटावर झाला.
२०१७: पुएब्ला भूकंप २०१७ - मेक्सिको मध्ये झालेल्या भूकंपामुळे किमान ३७० लोकांचे निधन तर ६ हजार हुन अधिक लोक जखमी.
२००७: युवराजसिंग - हे टी-२० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारे पहिले खेळाडू बनले.
२०००: कर्नाम मल्लेश्वरी - यांनी सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवले. असे करणाऱ्या त्या पहिलय भारतीय महिला बनल्या.
१९९१: ओत्झी आइसमन - इ.स. पूर्व ३३५० ते ३१०५ दरम्यान जगलेल्या माणसाची नैसर्गिक ममी इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्स पर्वतरांगेमध्ये सापडले.
१९८५: मेक्सिको सिटी भूकंप - भूकंपामुळे हजारो लोकांचे निधन तर सुमारे ४०० इमारती उद्ध्वस्त झाल्या.
१९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस - देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९८२: पहिले इमोटीकॉन्स - स्कॉट फॅहलमन यांनी पहिल्यांदाच :-) आणि :-( या पहिल्या इमोटीकॉन्सचा वापर केला.
१९७८: संयुक्त राष्ट्र - सॉलोमन बेटे संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
१९७०: ग्लास्टनबरी फेस्टिव्हल - मायकेल इव्हिस यांनी पहिल्यांदा आयोजित केला.
१९५७: प्लंबबॉब रेनियर अणुबॉम्ब - हा पहिला आण्विक स्फोट बनला जो संपूर्णपणे भूगर्भात समाविष्ट होता, त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही.
१९५०: कोरियन युद्ध - नाम नदीची लढाई: उत्तर कोरियाच्या सैन्याने केलेला हल्ला परतवून लावला.
१९४६: युरोप कौन्सिल - स्थापना झाली.
१९४४: दुसरे महायुद्ध - हर्टगेन फॉरेस्टची लढाई: सुरू झाली. पुढे अमेरिकन सैन्याने लढलेली ही सर्वात मोठी वैयक्तिक लढाई ठरेल.
१९४४: दुसरे महायुद्ध - मॉस्को युद्धविराम करार: फिनलंड आणि सोव्हिएत युनियन यांच्यात करारावर स्वाक्षरी झाली.
१८९३: न्यूझीलंड - देशामध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
१८७०: फ्रँको-प्रुशियन युद्ध - पॅरिस शहाराचा वेढा सुरू झाला. आत्मसमर्पण करण्यापूर्वी हे शहर चार महिन्यांहून अधिक काळ टिकून राहीले.
१८६८: ला ग्लोरिओसा क्रांती - स्पेनमध्ये सुरू झाली.
१७९९: फ्रेंच क्रांतिकारक युद्ध - बर्गनची लढाई: रशियन आणि ब्रिटिशांविरुद्ध फ्रेंच-डच यांचा विजय.
१७७७: अमेरिकन क्रांतिकारक युद्ध - साराटोगाची पहिली लढाई: ब्रिटीश सैन्याने कॉन्टिनेंटल आर्मीवर विजय मिळवला.


डिसेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023