५ जून घटना - दिनविशेष


२०२२: राफेल नदाल - यांनी १४वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले
२०२२: चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळल्याने १५ लोकांचे निधन तर ६ जखमी.
२०१५: मलेशिया देशात झालेल्या ६.० रेक्टर तीव्रतेच्या भूकंपाने रानौ, सबा, मलेशियात मोठ्या प्रमाणात भूस्खलनानंतर माउंट किनाबालूवर हायकर्स आणि माउंटन गाइड्ससह १८ लोकांचे निधन.
२००४: फ्रान्समध्ये प्रथमच दोन पुरुषांचा समलिंगी विवाह साजरा झाला.
२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
२००१: उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison) - अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान.
१९९७: काँगो - देशात दुसरे प्रजासत्ताक राष्ट्रीय युद्ध सुरू झाले.
१९९५: बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट - पहिल्यांदा तयार केले गेले.
१९९४: ब्रायन लारा - यांनी नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१९८४: ऑपरेशन ब्लू स्टार - सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला.
१९८१: एड्स रोग - पहिल्यांदा एड्सची लक्षणे असणारे रुग्ण अमेरिकेत सापडले.
१९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
१९७७: सिशेल्स - देशात उठाव झाला.
१९७५: सुएझ कालवा - पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
१९६७: इस्रायलच्या सीमेवर इजिप्शियन सैन्याच्या जमावाला प्रतिसाद म्हणून इस्रायलने इजिप्शियन हवाई क्षेत्रांवर अचानक हल्ले केले.
१९५९: सिंगापूर - देशात पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९४९: ओरापिन चैयाकन - यांची थायलंड देशामध्ये संसदेच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवड झाली.
१९४७: शीतयुद्ध - मार्शल योजना: अमेरिकेच्या राज्य सचिवांनी युद्धग्रस्त युरोपला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
१९४५: मित्रपक्ष नियंत्रण परिषद (Allied Control Council) - औपचारिकपणे जर्मनीच्या सत्तेवर आली.
१९४४: दुसरे महायुद्ध - डी-डे: १ हजार हून अधिक ब्रिटीश बॉम्बर्सनी नॉर्मंडी किनाऱ्यावर जर्मन तोफांच्या बॅटरीवर ५ हजार टन बॉम्ब टाकले.
१९४३: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने बल्गेरिया, हंगेरी आणि रोमानियावर युद्ध घोषित केले.
१९४१: दुसरे महायुद्ध - चोंगकिंग बॉम्बस्फोट: या बॉम्बहल्ल्यामुळे ४ हजार चोंगकिंग रहिवासी गुदमरले.
१९४०: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन फॉल रॉट ("केस रेड"): सुरु.
१९१७: पहिले महायुद्ध - लष्कर नोंदणी दिवस: अमेरिकेत लष्कर भरती सुरू झाली.
१९१६: लुई ब्रँडीस - यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली, असे पद धारण करणारे ते पहिले अमेरिकन ज्यू आहेत.
१९१६: पहिले महायुद्ध - ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध अरब उठाव सुरू झाला.
१९१५: डेन्मार्क - देशात महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.


सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022