१९९८:
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
१९९५:
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.
१९८९:
मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९६२:
डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.
१९५५:
पंडित नेहरुंच्या हस्ते हिंदुस्तानमशिन टूल्स या कारखान्याचे उदघाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
१९४८:
अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.
१९१०:
पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
१८६४:
भीषण चक्री वादळामुळे कोलकाता शहर उद्धवस्त होऊन सुमारे ६०,००० लोक ठार झाले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2022