आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

४ जानेवारी

आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन हा अंध आणि दृष्टिबाधित व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. ह्या लिपीचे निर्माते लुई ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिन निडवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या घोषणे नंतर या कार्यक्रमाची तारीख निवडली आणि पहिला जागतिक ब्रेल दिन ४ जानेवारी २०१९ रोजी साजरा करण्यात आला.