जिजाबाई

जिजाबाई

१२ जानेवारी १५९८ – १६ जून १६७४

जिजाबाई शहाजी भोसले ह्या मराठा साम्राज्याच्या राजमाता होत्या. त्यांना राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. मराठा साम्र्याज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या शिकवणीतूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्य बनवण्याचे ठरवले. जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना एक महान योद्धा आणि स्वराज्याचे संस्थापक बनवले असे मानले जाते.