लाल बहादूर शास्त्री

लाल बहादूर शास्त्री

२ ऑक्टोबर १९०४ – ११ जानेवारी १९६६

लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान आणि राजकारणी होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी देशाचे नेतृत्व केले. त्याच पार्श्वभूमीवर ‘जय जवान जय किसान’ हा नारा त्यांनी दिला. आणि लगेचच सामान्यजनतेमध्ये प्रसिद्ध झाला. गुजरातच्या अमूल दूध सहकारी संस्थेला पाठिंबा आणि राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाची स्थापना करून त्यांनी व्हाइट क्रांती – दुधाचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्याच्या राष्ट्रीय मोहिमेस प्रोत्साहन दिले. त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.