लुई ब्रेल
४ जानेवारी १८०९ – ६ जानेवारी १८५२
लुई ब्रेल हे फ्रेंच शिक्षक आणि अंध किंवा दृष्टिहीन लोकांच्या वाचन आणि लेखन प्रणालीचे शोधकर्ता होते. बालपणाच्या अपघातानंतर त्यांना अंधत्व आले आणि त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी ब्रेल भाषेचा शोध लावला. या भाषेमुळे जगभरात अंधळ्या लोकांना लिहिता आणि वाचता येते. त्यांनी तयार केलेली भाषा आजपर्यंत अक्षरशः तशीच्या तशीच आहे आणि जगभरात ही अंध व्यक्तीची भाषा फक्त ‘ब्रेल’ म्हणून ओळखली जाते. यांच्या जन्मानिमित्त आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन साजरा केला जातो.