मकर संक्रांत

मकर संक्रांत

१४ जानेवारी

मकर संक्रांत, उत्तरायण, माघी किंवा फक्त संक्रांती हा हिंदू धर्मातील सण सूर्य या देवतेला समर्पित करणारा सण आहे. हा मकर राशी मध्ये सूर्याच्या संक्रमणाचा पहिला दिवस आहे आणि महिन्याच्या शेवटी हिवाळा संपून उन्हाळ्याचे लांब दिवस येतात. हा सण भारत आणि नेपाळमधील लोक आपल्या शेतपिकाच्या कापणीचा उत्सव म्हणून सुद्धा साजरा करतात. मकर संक्रांत हा काही प्राचीन भारतीय आणि नेपाळी सणांपैकी एक आहे जो सूर्य चक्रांनुसार साजरा केला जातो., तर बहुतेक उत्सव चंद्र-चक्रानुसार साजरे केले जातात. भारतातील अनेक राज्यात स्थानिक भाषेप्रमाणे बिहू, उत्तरायण, पोंगल, हंगराई अश्या नावाने संक्रांत ओळखली जाते. आज पंतग उडवून आणि तिळगुळ वाटून साजरा करण्यात येतो.