मारोतराव कन्नमवार

मारोतराव कन्नमवार

१० जानेवारी १९०० – २४ नोव्हेंबर १९६३

मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. राजकारणी, लेखक आणि समाजसुधारक म्हणून सुद्धा ते प्रचलित आहेत. मुख्यमंत्री पदावर कार्यरत असतानाच त्यांचे निधन झाले. अगदी अल्पकालावधीसाठी मुख्यमंत्री असताना देखील संरक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधा अशा महत्वाचे प्रकल्प त्यांनी प्रस्थापित केले.