मोरारजी देसाई

Morarji Desai

मोरारजी देसाई

जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ – निधन: १० एप्रिल १९९५

मोरारजी देसाई हे भारताचे ४थे पंतप्रधान होते. १९७७ ते १९७९ हा काळात त्यांनी जनता पक्षाद्वारे पंतप्रधान म्हणून कार्य केले. मोरारजी देसाई हे गांधीवादी अनुयायी, समाजसेवक आणि उत्तम सुधारक होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीत हस्तक्षेप मागे घेतला आणि बाजारपेठेत स्वस्त साखर आणि तेल उपलब्ध करून दिली. ह्याचा परिणाम झाल्यामुळे रेशनिंग दुकाने अक्षरशः बंद पडली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शांती निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याच्यासाठी त्यांना पाकिस्तान देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-पाकिस्तान’ देण्यात आला आहे. तसेच त्यांचा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ सुद्धा प्रदान करण्यात आला आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.