मुक्री

मुक्री

५ जानेवारी १९२२ – ४ सप्टेंबर २०००

मुहम्मद उमर मुकरी उर्फ मुक्री हे भारतीय चित्रपट विनोदी कलाकार होते. १९४५ मध्ये प्रख्यात चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्या सोबत त्यांनी चित्रपटाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ५० पेक्षा जास्त वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मुक्री यांच्या स्मित हसर्‍यासह, लहान उंची आणि अचूक विनोदी कलाकारीने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले.