नाना पाटेकर

नाना पाटेकर

विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय चित्रपट अभिनेते आणि लेखक, समाजसेवी आणि चित्रपट निर्माते आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजिरा येथे झाला. त्यांना अग्नी साक्षी, क्रांतिवीर अपहरण ह्या हिंदी तर नटसम्राट, यशवंतराव चव्हाण आणि डॉ.प्रकाश बाबा आमटे या मराठी चित्रपटांमधील अप्रतिम कलाकारीसाठी ओळखले जाते. इरफान खान यांच्यासह ते एकमेव अभिनेतेआहेतज्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायक श्रेणींमध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.