नारायण भिकाजी परुळेकर

नारायण भिकाजी परुळेकर

२० सप्टेंबर १८९८ – ८ जानेवारी १९७३

नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर हे सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक होते. १९३२ साली त्यांनी पुण्यात वैनिक वृत्तपत्र सकाळची सुरवात केली. सकाळ हा सध्याच्या काळातील मुख्य वर्तमानपत्रांपैकी आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात लाखांहून अधिक प्रति विकल्या जातात. परुळेकर हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुद्धा होते. त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.