पत्रकार दिन

Patrakar Din

पत्रकार दिन

६ जानेवारी

महाराष्ट्रातील पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन साजरा केला जातो. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. महाराष्ट्रातील मराठी जनसामान्य लोकांपर्यंत माहिती आणि तत्कालीन घडामोडी पोहोचण्याच्या उद्देशाने हे वृत्तपत्र मराठी भाषेतून सुरु करण्यात आले होते. तसेच स्थानिकांच्या अडचणी आणि भावना ब्रिटिश सत्ताधारी अधिकाऱ्यांना समजाव्यात म्हणून ‘दर्पण’ मध्ये एक स्तंभ इंग्रजी भाषेत सुद्धा लिहिला जात असे. तब्बल ८ वर्षानंतर १८४० मध्ये शेवटचा अंक प्रकाशित झाला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.