रघुनाथ माशेलकर

रघुनाथ माशेलकर

रघुनाथ अनंत माशेलकर तसेच रमेश माशेलकर हे भारतीय रसायन अभियंते आहेत. त्यांचा जन्म माशेळ, गोवा येथे १ जानेवारी १९४३ साली झाला. अमेरिकातील हळदिच्या पेटंट विरुद्ध झालेल्या कायदेशीर वाद आणि भांडणामद्धे माशेलकर यांनी नेतृत्व केले होते. हळद ही भारताची पारंपरिक जडीबुटी आणि त्यांचे ज्ञान सुद्धा अनेक पिढ्यांपासून अवगत आहे. तरी त्याविरुद्ध पेटंट रद्द करण्यात त्यांनी यश मिळवले. म्हणून त्यांना हळदी घाटीचा योद्धा असे नाव देण्यात आले. तसेच ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) चे माजी महासंचालक आहेत.