राहुल द्रविड

राहुल द्रविड

११ जानेवारी १९७३

राहुल शरद द्रविड हे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास २५,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. म्हणूनच त्यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या याच यशामुळे त्यांना ‘द ग्रेट वॉल’ असे संबोधले जाते. ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ऑपरेशन्सचे संचालक आहेत. त्यांना त्यांच्या कामगिरी आणि क्रिकेटमधील योगदानाबद्दल खेडाळुनसाठी दिला जाणारा ‘अर्जुना पुरस्कार’ देण्यात आला आहे. तसेच भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ आणि भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे.