राष्ट्रीय युवा दिन

राष्ट्रीय युवा दिन

१२ जानेवारी

भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त भारतात १२ जानेवारीला युवा दिन साजरा केला जातो. स्वामीजींचे तत्वन्यान आणि ज्या आदर्शामुळे ते जगले आणि कार्य केले ते भारतीय युवकांसाठी प्रेरणा स्थान बनले. त्यांच्या विचारांचा नव्या युवा पिढीवर खूप प्रभाव आहे. तसेच त्यांच्या लेखणी आणि साहित्यामुळे अनेक संस्था, शिक्षणव्यवस्था आणि युवावर्ग यांना प्रोत्साहित केले आहे. म्हणून १९८४ मध्ये भारत सरकारने हा दिन राष्ट्रीय युवा दिन घोषित केला.