सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

जन्म: ३ जानेवारी १८३१ – निधन: १० मार्च १८९७

सावित्रीबाई फुले ह्या भारतीय समाजसुधारक, शिक्षिका आणि महाराष्ट्रातील कवीयत्री होत्या. त्यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली. जातीभेद आणि लिंगभेद आणि अन्यायकारक वागणूक बंद करण्यासाठी त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीतील त्या महत्त्वाच्या व्यक्ती मानल्या जातात.