श्रीनिवास वर्धन

श्रीनिवास वर्धन

जन्म: २ जानेवारी १९४०

सातमंगलम रंगा अय्यंगार श्रीनिवास वर्धन उर्फ एस. आर. श्रीनिवास वर्धन हे भारतीय अमेरिकन गणितज्ञ आहेत. संभाव्यतेचा सिद्धांत आणि विशेषत: मोठ्या विचलनांचे एकत्रीत सिद्धांत यामध्ये त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. याच योगदानाबद्दल त्यांना २००८ मध्ये भारताचा ३रा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ देण्यात आला आहे. तसेच नॅशनल मेडल ऑफ सायन्स फॉर मॅथमॅटिकस, अमेरिकेचा अबेल प्राईस पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.