स्टिफन हॉकिंग

Stephan Hawking

स्टिफन हॉकिंग

जन्म: ८ जानेवारी १९४२ – निधन: १४ मार्च २०१८

स्टिफन विल्यम हॉकिंग हे इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वविज्ञानी आणि लेखक होते. ह्या काळातील सर्वात ओळखण्यायोग्य वैज्ञानिक, म्हणून हॉकिंग यांचा प्रतिष्ठित दर्जा आहे. गुरुत्वाकर्षण, ब्लॅक होल आणि कॉस्मॉलॉजी समजून घेण्यासाठी स्टिफन हॉकिंग यांचे योगदान खरोखरच अपार होते. ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या १ करोड हुन अधिक प्रति विकल्या गेल्या आहेत. यामुळेच ब्रह्मांडशास्त्र आणि त्यांचे विचार, कार्य आणि संशोधन सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचले. ते विज्ञानाचे प्रतीक आणि सर्वांसाठी प्रेरणास्थान असून त्यांना अनेक पुरस्कार आणि मानचिन्हे देण्यात आली आहेत.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.