११ ऑक्टोबर – मृत्यू

११ ऑक्टोबर - मृत्यू

११ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १८८९: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८१८) १९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९०९) १९८४: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन. (जन्म: २७ जून १९१७) १९९४: कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन. १९९६: वेस्ट इंडीजचा […]

११ ऑक्टोबर – जन्म

११ ऑक्टोबर - जन्म

११ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता) १९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार) १९१६: पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०) १९१६: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ […]

११ ऑक्टोबर – घटना

११ ऑक्टोबर - घटना

११ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना. १९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली. २००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर. २००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.