३ फेब्रुवारी – मृत्यू

३ फेब्रुवारी - मृत्यू

३ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन. १८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१) १९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८५६) १९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)

३ फेब्रुवारी – जन्म

३ फेब्रुवारी - जन्म

३ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १८२१: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल  यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९१०) १८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३) १८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म. १९००: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५) १९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.

३ फेब्रुवारी – घटना

३ फेब्रुवारी - घटना

३ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली. १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले. १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली. १९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला. १९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित […]