ठळक दिनविशेष २०२०

दैनंदिन घडामोडीतील ठळक दिनविशेष २०२०

नोव्हेंबर

२६ नोव्हेंबर २०२०: भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि नॅसकॉमचे अध्यक्ष पदमभूषण पुरस्कार विजेते फकीर चंद कोहली यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९२४)

२४ नोव्हेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते अशिएश रॉय यांचे निधन. (जन्म: १८ मे १९६५)

२३ नोव्हेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते वरून बडोला यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९७४)

१९ नोव्हेंबर २०२०: पदमश्री पुरस्कार विजेते, भारतीय संथाली भाषाशास्त्रज्ञ आणि आदिवासी हक्कांचे वकील दिगंबर हंसदा यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९३९)

१६ नोव्हेंबर २०२०: प्रख्यात सुवर्ण व्यावसायिक रतनलाल सी बाफना यांचं निधन.

१५ नोव्हेंबर २०२०: भारतीय (बंगाली) दिग्दर्शक, अभिनेते, आणि पदमभूषण पुरस्कार विजेते सौमित्र चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म:१९ जानेवारी १९३५)

१४ नोव्हेंबर २०२०: पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे, आणि नागपूरचे भूषण सतई.

१२ नोव्हेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते असिफ बसरा यांचे निधन. (जन्म: २७ जुलै १९६७)

ऑक्टोबर

१५ ऑक्टोबर २०२०: सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या वेशभूषा डिझाईनर भानु अथैया यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १९२९)

१४ ऑक्टोबर २०२०: पदमश्री पुरस्कार विजेत्या भारतीय कुचिपुडी नृत्यांगना शोभा नायडू यांचे निधन.

१२ ऑक्टोबर २०२०: भारतीय फुटबॉल खेळाडू कार्ल्टन चॅपमन यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९७१)

८ ऑक्टोबर २०२०: मराठी चित्रपट अभिनेता अविनाश खारशीकर यांचे निधन.

५ ऑक्टोबर २०२०: भारतीय अभिनेते आणि पार्श्वगायक शक्ती ठाकूर यांचे निधन.

५ ऑक्टोबर २०२०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक अनिल देवगण यांचे निधन.

४ ऑक्टोबर २०२०: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते विशाल आनंद यांचे निधन. 

सप्टेंबर

२८ सप्टेंबर २०२०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक गुरुराजा श्यामाचार्य अमूर यांचे निधन. ( जन्म: ८ मे १९२५)

२७ सप्टेंबर २०२०: भारताचे माजी अर्थमंत्री मेजर जसवंत सिंग जासोल यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३८)

२६ सप्टेंबर २०२०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि इंडियन कॉउंसिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन (आयसीआरआयईआर) बोर्ड ऑफ गव्हर्नर्स च्या अध्यक्ष इशर जज अहलुवालिया यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९४५)

२५ सप्टेंबर २०२०: भारतीय सुप्रसिध्द पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: ४ जून १९४६)

२४ सप्टेंबर २०२०: भारतीय अणु वैज्ञानिक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शेखर बासू यांचे निधन.( जन्म: २० सप्टेंबर १९५२)

२३ सप्टेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते भूपेश पांड्या यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९७२)

२२ सप्टेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेत्या आशालता वाबगावकर यांचे निधन.( जन्म: २ जुलै १९४१)

१६ सप्टेंबर २०२०: भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक, पी. आर. क्रिष्णा कुमार यांचे निधन.( जन्म: २३ सप्टेंबर १९५१)

१५ सप्टेंबर २०२०: भारतीय क्रिकेटपटू (महाराष्ट्र) सदाशिव पाटील यांचे निधन.(जन्म: १० ऑक्टोबर १९३३)

१३ सप्टेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते (ओडिया) अजित दास यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९)

११ सप्टेंबर २०२०: श्रीलंकेचे क्रिकेटर टोनी ओपाथा यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९४७)

७ सप्टेंबर २०२०: भारतीय, तेलगू चित्रपट अभिनेते अक्किनेनी नागराजू  यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५९)

७ सप्टेंबर २०२०: भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९२९)

५ सप्टेंबर २०२०: भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते जॉनी बक्षी यांचे निधन.(जन्म: २ जानेवारी १९३२)

१ सप्टेंबर २०२०: भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) शेखर गवळी यांचे निधन.(जन्म: ६ ऑगस्ट १९७५)

१ सप्टेंबर २०२०: पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते जेर्झी स्काझाकिएल यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १९४९)

ऑगस्ट

३१ ऑगस्ट २०२०: भारताचे १३वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन.(जन्म: ११ डिसेंबर १९३५)

२८ ऑगस्ट २०२०: अमेरिकन अभिनेते चाडविक बॉसमन यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९७६)

२७ ऑगस्ट २०२०: भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा आयोगाचे अध्यक्ष अरुणाचलम लक्ष्मणन यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९४२)

२६ ऑगस्ट २०२०: फोर्ब्सच्या यादीनुसार ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे २०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करणार्‍या इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले.

१६ ऑगस्ट २०२०: भारतीय क्रिकेटपटू चेतन प्रतापसिंग चौहान यांचे निधन. (२१ जुलै १९४७)

११ ऑगस्ट २०२० :  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले की रशियाने जगातील पहिल्या कोव्हीड -१९ लसला मान्यता .

ऑगस्ट २०२०: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)

ऑगस्ट २०२०: लेबनॉन येथील बेरूत येथे झालेल्या भीषण स्पोटामध्ये २२० पेक्षा जास्त लोक ठार तर ३००००० जास्त लोक बेघर.

३ ऑगस्ट २०२०: आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी जॉन ह्यूम यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९३७)

जुलै

२८ जुलै २०२०: भारतीय तेलगू अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रवी कोंडाला राव यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १९३२)

२४ जुलै २०२०: भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री अमला शंकर यांचे निधन.(जन्म: २७ जून १९१९)

२१ जुलै २०२०: मध्य प्रदेशचे २२ वे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९३५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.