विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकर

६ जानेवारी १९२८ – १९ मे २००८

विजय धोंडोपंत तेंडुलकर हे अग्रगण्य भारतीय नाटककार, चित्रपट आणि दूरदर्शन लेखक, साहित्यिक निबंधकार, राजकीय पत्रकार आणि मुख्यत: सामाजिक भाष्यकार होते. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी साहित्यात कार्य केले. ह्या काळात त्यांनी २७ पूर्ण नाटकं आणि २५ एकांकिका नाटकं लिहिली आहेत. तेंडुलकरांची बरीच नाटके मुख्यतः वास्तविक जीवनातील घटना किंवा सामाजिक घडामोडींवर आधारित किंवा त्यामुळे प्रभावित झालेले आहेत. त्यांच्या नाटकांचे भाषांतर अनेक भारतीय भाषांमध्ये आणि अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा झाले आहे. त्यांच्या ह्याच वैशिट्यामुळे त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि आणि अनेक पुरस्कार मिळाले आहेत.