१७ जून
घटना
- २०२२: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट — इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड्स विरुद्ध ४९८ इतक्या सर्वात जास्त धाव केल्या.
- २०२२: चीन — फुजियान या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचे लोकार्पण.
- १९९१: राजीव गांधी — यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- १९८५: स्पेस शटल प्रोग्राम — STS-51-G मिशन: अंतराळात जाणारे सुलतान बिन सलमान अल सौद हे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम बनले.
- १९६७: चीन — देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली.
- १९६३: अमेरिका — सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
- १९४४: आइसलँड — देशाने डेन्मार्कपासून स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
- १९४०: दुसरे महायुद्ध — दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.
- १९४०: दुसरे महायुद्ध — आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.
- १९४०: दुसरे महायुद्ध — ब्रिटीश सैन्याने फोर्ट कॅपुझो, लिबिया इटालियन सैन्याकडून जिंकून घेतला.
- १८८५: — न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे आगमन झाले.
- १६३१: मुमताज — ज्यांच्या साठी ताजमहाल बांधला त्यांचे बाळाला जन्म देताना निधन.
जन्म
- १९८१: शेन वॉटसन — ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
- १९७३: लिएंडर पेस — भारतीय टेनिसपटू — पद्म भूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते
- १९२०: फ्रांस्वा जेकब — फ्रेंच जीवशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
- १९१२: नित्यानंद महापात्रा — भारतीय पत्रकार आणि राजकारणी
- १९०३: रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड — चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते
- १९०३: ज्योती प्रसाद अग्रवाला — भारतीय कवी, नाटककार आणि दिग्दर्शक
- १९०३: बाबूराव विजापुरे — संगीतशिक्षक
- १८९८: कार्ल हेर्मान — जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
- १८६७: जॉनरॉबर्ट ग्रेग — लघुलेखन पद्धतीचे शोधक
- १७०४: जॉन के — फ्लाइंग शटलचे शोधक
- १२३९: एडवर्ड (पहिला) — इंग्लंडचा राजा
निधन
- २०१९: मोहम्मद मोर्सी — इजिप्त देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष, अभियंते, शैक्षणिक आणि राजकारणी
- २००४: इंदुमती पारीख — सामाजिक कार्यकर्त्या
- १९९६: बाळासाहेब देवरस — राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३रे सरसंघचालक
- १९८३: शरद पिळगावकर — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
- १९६५: मोतीलाल — अभिनेते
- १९२८: गोपबंधु दास — भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी
- १८९५: गोपाल गणेश आगरकर — थोर समाजसुधारक
- १८९३: जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक — भारताचे १४ वे राज्यपाल
- १६७४: जिजाबाई — मराठा साम्राज्याच्या राजमाता
- १६३१: मुमताज महल — शाहजहानची पत्नी
- १२९७: श्री निवृत्तीनाथ महाराज — ज्येष्ठ गुरु संत
- १०३१: Goryeo च्या Hyeonjong — कोरियन राजा