१८ जून
घटना
- २००९: लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) — नासाने रोबोटिक अंतराळयान प्रक्षेपित केले.
- २००६: कझाकस्तान — देशाने पहिला उपग्रह KazSat-1 प्रक्षेपित केला.
- १९८३: सॅली राइड — या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर आहेत.
- १९८१: — जनावरांमधे आढळणाऱ्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
- १९७९: दुसरी स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन चर्चा (SALT II) — अमेरिका आणि सोव्हिएत युनियन देशांनी स्वाक्षरी केली.
- १९५६: — रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
- १९५३: इजिप्त — प्रजासत्ताक बनले.
- १९४६: — डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
- १९३०: — चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
- १९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालय — स्थापना.
- १८३०: — फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
- १८१५: नेपोलियन — यांचा वॉटर्लूच्या लढाईत पराभव.
जन्म
- १९६५: उदय हुसेन — सद्दाम हुसेन यांचा मुलगा
- १९४२: थाबो म्बेकी — दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
- १९४२: पॉल मॅकार्टनी — संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य
- १९३१: के. एस. सुदर्शन — राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक
- १९१६: ज्युलिओ सीझर टर्बे आयला — कोलंबियाचे २५वे राष्ट्राध्यक्ष
- १९१३: रॉबर्ट मोन्डवी — ओपस वन व्हाइनरीचे सहसंस्थापक
- १९११: कमला सोहोनी — पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ
- १८९९: दादा धर्माधिकारी — स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक
- १८८७: अनुग्रह नारायण सिन्हा — भारतीय वकील आणि राजकारणी
- १८४५: चार्ल्स लुई अल्फोन्स लावेरन — फ्रेंच वैद्य आणि परजीवीशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
निधन
- २०२१: मिल्खा सिंग — भारतीय धावपटू, द फ्लाइंग शीख — पद्मश्री
- २०२०: लच्छमानसिंग लेहल — मेजर-जनरल — वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा
- २०१६: जेपियार — सत्यबामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु
- २००९: उस्ताद अली अकबर खान — मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक — पद्म विभूषण, पद्म भूषण
- २००५: संजय लोळ — भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
- २००५: सय्यद मुश्ताक अली — भारतीय क्रिकेटपटू — पद्मश्री
- २००३: जानकीदास — हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते
- १९९९: श्रीपाद रामकृष्ण काळे — साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
- १९७४: गोविंद दास — स्वातंत्र्यसैनिक आणि साहित्यिक
- १९६२: नानासाहेब घारपुरे — पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक
- १९५८: डग्लस जार्डिन — इंग्लिश क्रिकेटपटू
- १९३७: गस्टोन डॉमेरगून — फ्रान्स देशाचे १३वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी
- १९३६: मॅक्झिम गॉर्की — रशियन लेखक
- १९०२: सॅम्युअल बटलर — इंग्लिश लेखक
- १९०१: रामचंद्र भिकाजी गुंजीकर — मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक
- १८५८: राणी लक्ष्मीबाई — झाशीची महाराणी
- १६७३: जीन मॅन्स — फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका