१ ऑगस्ट घटना
घटना
- १४९८: ख्रिस्तोफर कोलंबस – व्हेनेझुएला देशाला भेट देणारे पहिले युरोपियन बनले.
- १७७४: ऑक्सिजन – जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
- १८००: युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड – ग्रेट ब्रिटनआणि आयर्लंडचे राज्य विलीन करून स्थापन झाले.
- १८३४: ब्रिटिश साम्राज्य – गुलामगिरी निर्मूलन कायदा १८३३ नुसार ब्रिटिश साम्राज्यात (ईस्ट इंडिया कंपनी वगळून) गुलामगिरी संपुष्टात आली.
- १८५५: मॉन्टे रोझा – या आल्प्स पर्वत रांगेतील दुसरे सर्वोच्च शिखरावर पहिली यशस्वी चढाई.
- १८७६: अमेरिका – कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
- १८९४: पहिले चीन-जपानी युद्ध – सुरू.
- १९११: हॅरिएट क्विंबी – एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला बनल्या.
- १९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले, इथूनच पहिल्या महायुद्धाची सुरवात.
- १९३६: ऑलिम्पिक – बर्लिन, जर्मनी मध्ये १९३६च्या ऑलिम्पिक स्पर्धाना सुरवात.
- १९४३: दुसरे महायुद्ध – ब्लॅक संडे: ऑपरेशन टायडल वेव्ह: अमेरिकन सैन्याचा रोमानिया देशातील तेलसाठे नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न.
- १९४४: दुसरे महायुद्ध – वॉर्सॉ, पोलंड देशात नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
- १९५७: नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) – अमेरिका आणि कॅनडा देशांनी स्थापना केली.
- १९६०: पाकिस्तान – इस्लामाबाद शहर राजधानी बनले.
- १९६०: बेनिन – देशाने फ्रान्सपासून स्वातंत्र्य घोषित केले.
- १९६१: डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA), अमेरिका – संस्थेची सुरवात.
- १९८०: विग्डीस फिनबोगाडोत्तिर – या आइसलँड देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, आणि जगातील पहिल्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला राष्ट्रप्रमुख बनल्या.
- १९८१: एम.टी.व्ही. (MTV) – चॅनलचे अमेरिकेत प्रसारण सुरु झाले.
- १९९४: भारतीय रेल्वे – प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
- १९९६: राजकुमार – कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- २००१: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ – स्थापना.
- २००८: के२ शिखर – ११ पर्वतारोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शीखरावर निधन झाले.
- २००८: बीजिंग-टियांजिन इंटरसिटी रेल्वे – जगातील सर्वात वेगवान प्रवासी रेल्वेची सेवा सुरु.
- २०२२: मंकीपॉक्स रोगराई २०२२ – भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली.